पाकीस्थान मध्ये फाशीची शिक्षा झालेल्या भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या ताब्यातून सोडविण्याच्या मागणी साठी मनसेने कल्याणात बाईक रॅली व निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता . या वेळी भारतमाता की जय व पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या.
खड्कपाडा येथील साई चौकात सुरु झालेली ही बाईक रॅली खड्कपाडा चौक बेतुरकर पाडा येथून सहजानंद चौक होत शिवाजी चौकात आली. शिवाजी चौकात मनसे कार्यकर्त्यांनी पाकिस्थान मुर्दाबादच्या घोषणा देत पाकिस्थानचा निषेध केला.
या कार्यक्रमात बाईक रॅली व निदर्शनात मनसे प्रदेश काका मांडले, माजी आमदार प्रकाश भोईर , जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर , कल्याण शहर अध्यक्ष कोस्तुभ देसाई, नगरसेविका कस्तुरी देसाई, महिला अध्यक्षा उर्मिला तांबे आदी प्रमुख कार्यकर्त्या सह अनेक इतर कार्यकर्ते सामील झाले होते.